Click Here to Download Android App for Regular Updates
Since science is a subject that promotes research and innovation, the importance of science subject is unique. Because the subject of science does not leave us in this entire journey from school education to higher education. Therefore, the interest of this important subject requires activities along with the curriculum to make the science subject more interesting to the students. Activities make learning science interesting. Also, science teachers need to support innovative activities so that students can develop interest in science and understand the concepts of science. The above mentioned various activities are innovative activities started in our school (Zilha Parishad Primary School Jarewadi). It is believed that all these activities will be a guide for science teachers.
1) To promote friendship of science subject.
2) To create interest in science subject.
3) To understand science concepts in a simpler way.
4) To inculcate the concept of action learning teaching.
5) To increase experimentation in teaching and learning.
6) Developing a scientific approach.
7) To develop interest in reading science books.
8) Presenting the science experiment itself.
9) Creation of various posters committee leaflets collection booklets on science.
10) Making science puzzles to improve the quality of science subject.
Making posters based on various topics and putting them up in the facade of the school. Posters provide students with information on different subjects. Gives an opportunity to think. Some murals challenge students, while also stimulating students' inquisitive nature.
Thus science teachers should create different topic based wall papers and make the learning process enjoyable by making available to their students. At times, students should be asked to make posters to help students acquire the skills of information collection, presentation, and presentation. Below are some examples of murals.
विज्ञान हा विषय संशोधन व नवनिर्मितीला चालना देणारा विषय असल्याने विज्ञान विषयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण शालेय शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत या संपूर्ण प्रवासात विज्ञान विषय आपली सोबत सोडत नाही. म्हणून या महत्त्वाच्या विषयाची आवड विद्यार्थ्यांना विज्ञान विषय अधिकाधिक रंजक व्हावा म्हणून अभ्यासक्रमासोबत उपक्रमांची गरज असते. उपक्रमांमधून विज्ञान शिकण्यात रंजकता येते. तसेच विज्ञान विषयाची आवड विद्यार्थ्यांना निर्माण व्हावी, विज्ञान विषयातील संकल्पनांचे आकलन व्हावे यासाठी विज्ञान शिक्षकांनी नवनवीन उपक्रमाची साथ घेणे आवश्यक आहे. सदरील विविध उपक्रम आमच्या शाळेत (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जरेवाडी) सुरू झालेले नाविण्यपूर्ण उपक्रम आहेत. हे सर्वच उपक्रम विज्ञान शिक्षकांसाठी दिशादर्शक ठरतील असा विश्वास आहे.
१) विज्ञान विषयाची मैत्री वाढवणे.
२ ) विज्ञान विषयाची आवड निर्माण करणे.
३) विज्ञान विषयातील संकल्पना अधिक सोप्या पद्धतीने समजावून घेणे.
४) कृतीयुक्त अध्ययन अध्यापन संकल्पना रुजवणे.
५) अध्ययन-अध्यापनात प्रयोगशीलता वाढवणे.
६) वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे.
७) विज्ञान विषय पुस्तक वाचनाची आवड निर्माण करणे.
८) स्वतः विज्ञान प्रयोगाचे सादरीकरण करणे.
९) विज्ञान विषयक विविध पोस्टर समिती पत्रके संग्रह पुस्तिका निर्माण करणे.
१०) विज्ञान कोडे बनवणे विज्ञान विषयाची गुणवत्ता वाढवणे.
विविध विषयावर आधारित भित्तीपत्रके बनविणे आणि ते शाळेच्या दर्शनी भागात लावावे. भित्तीपत्रके विद्यार्थ्यांना वेगवेळ्या विषयांची माहिती देतात. विचार करण्याची संधी देतात. काही भित्तीपत्रके विद्यार्थ्यांना आव्हाने देतात, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शोधक वृत्तीला चालना देतात.
अशाप्रकारे विज्ञान शिक्षकांनी वेगवेगळ्या विषयांवर आधारित भित्तीपत्रके तयार करावीत आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून शिकण्याची प्रक्रिया आनंदी बनवावी. काही वेळा भित्तीपत्रके विद्यार्थ्यांना बनविण्यास सांगावे जेणेकरून माहितीचे संकलन तिचे सादरीकरण, पत्रकांची निर्मिती ही कौशल्ये आत्मसात होण्यास विद्यार्थ्यांना मदत होणार आहे. खाली भित्तीपत्रकांची काही उदाहरणे दिली आहेत.
Small But Smart Science Kit
प्रत्येक विद्यार्थ्याने प्रयोग शाळेत जाऊन प्रयोग सादरीकरणाचा तसेच प्रात्यक्षिकाचा अनुभव घेणे ही गोष्ट मोठ्या पटांच्या शाळेत तसेच ज्या ठिकाणी प्रयोगशाळा नाही अशा छोट्या शाळेमध्ये सहज शक्य होत नाही. म्हणून आम्ही यावर एक उपाय शोधला. विज्ञान अध्ययन अध्यापन करताना प्रत्येक वेळी प्रयोगशाळेत जाण्याच्या ऐवजी प्रयोग शाळाच आपल्यासोबत ठेवली तर अध्ययनात आणि अध्यापनात सुलभता येईल आणि मुले आनंदाने वेगवेगळे प्रयोग करुन पाहतील. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला सोबत ठेवता येईल अशी "माझी छोटीशी प्रयोगशाळा" तयार करता येईल.यात आपण परिसरातील सहज उपलब्ध होणारे साहित्य ठेवू शकतो. उदा. कंगवा, आइस्क्रिमच्या काड्या, धातुचा ठोकळा, रबर, फुगा, काचेचा ग्लास, चुंबक, गोटी, बॉल, कप चुंबक, आरसा, पुठ्ठा, इत्यादी. प्रथम या प्रयोग शाळेतून आपल्याला कोणते प्रयोग करायचे आहेत. याच्या संकल्पना निश्चीत केल्या जातात. प्रयोग प्रात्यक्षिकाचे वर्गस्तरावर गट केलेले असतात.त्या गटांमध्ये प्रयोगाचे प्रात्यक्षिक घेतले जाते. तसेच स्वतःच प्रयोग केल्याने ही संकल्पना दृढ होते. यातून मुलांना आवड निर्माण होते तसेच पारंपारिक प्रयोग शाळा व विद्यार्थी यांच्यातील अंतर दूर करण्यासाठी “MY SCIENCE LAB" आहे. यातून प्रयोगशीलतेला वाव मिळत आहे व अभ्यासक्रमातील संकल्पना ही सोप्या होत आहेत. अशाप्रकारे विद्यार्थी आणि शिक्षक स्वत:ची प्रयोगशाळा निर्माण करू शकतील.
विज्ञान कोडे हा एक दैनंदिन प्रकारातला उपक्रम आहे. यामध्ये शाळेतील दर्शनी भागात एक विज्ञान कोडे व गणित कोडे (गणिती उदाहरण) दिले जाते दुसऱ्या दिवशी त्या कोड्याचं उत्तर परिपाठात विचारले जाते. ज्या मुलांना त्याचे उत्तर अचूक सांगता येईल त्या मुलांचे कौतुक केले जाते. अनेक विद्यार्थी विज्ञान कोडे तयार करू शकतात. त्यांनी बनवलेले विज्ञान कोडेसुद्धा फलकावर लिहिले जावीत. विज्ञान कोडे या उपक्रमातून विद्यार्थ्यांचा विचारप्रक्रियेला चालना मिळते, वैज्ञानिक संकल्पना दृढ होतात त्याच बरोबर विविधांगी विचार करण्यास चालना मिळते. सृजनशील व विचारप्रवर्तक असा हा उपक्रम " विज्ञान कोडे " उपक्रम आम्ही आमच्या शाळेत घेत असतो.
खाली काही विज्ञान कोड्यांची उदाहरणे दिलेली आहेत. अशाप्रकारे कोडे तयार करण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.
विज्ञान विषयाची आवड निर्माण झाल्यावर विज्ञान विषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी, विज्ञान विषयाची गुणवत्ता वाढविण्यासाठी, विज्ञान विषयाचे ज्ञान समृद्ध बनवण्यासाठी आम्ही शाळेमध्ये ' विज्ञान ग्रंथालय' सुरू करता येते. यामध्ये विज्ञान कथा का ? कसे ? कोण ? असे आपल्या प्रश्नांची उत्तरे देणारे पुस्तके, संशोधनपर पुस्तके, शास्त्रज्ञाचे चरित्र, विविध प्रयोगांची उदाहरणे, खगोशास्राची इत्यादी पुस्तकांचा समावेश विज्ञान ग्रंथालयामध्ये करण्यात येतो. अभ्यासक्रमाला पुष्टी देण्याचं काम काम ही पुस्तके करत असतात आठवड्यातून एक पुस्तक विद्यार्थ्याला दिले जावे, त्याचे वाचन करून विद्यार्थी पुस्तकातील महत्त्वाच्या गोष्टींच्या नोंदी ठेवतील. आपल्या मित्रांशी, शिक्षकांशी चर्चा करतील. विज्ञान जगातील गंमतीजमती समजण्यासाठी, तसेच विद्यार्थ्यांचा विज्ञान प्रवास समृद्ध करण्यासाठी विज्ञान ग्रंथालय हा उपक्रम अत्यंत उपयुक्त आहे...!
कर के देखो हा उपक्रम Let's Do It या नावानेही ओळखला जाऊ शकतो. या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग करण्याची संधी मिळते. प्रत्यक्ष प्रयोग केल्यावर विज्ञान संकल्पनांचे चांगल्या प्रकारे आकलन होते. विद्यार्थ्यांना संकल्पना समजण्यास सोपे जाते. दर शनिवारी परिपाठामध्ये दोन मुले / मुली एका प्रयोगाचे सादरीकरण करू शकतील. आठवड्यातून एक प्रयोग घेण्यापेक्षा दररोज एक छोटा प्रयोग सुद्धा शिक्षक घेऊ शकतात.
आमच्या शाळेत घेण्यात आलेला उपक्रम थोडक्यात असा -प्रथम दोन मुले/मुली निश्चित करून त्यांना एका प्रयोगाचे नाव सांगितलं जातं. आवश्यक साहित्य सांगितले जाते, प्रयोगासाठी लागणारे साहित्य शक्यतो विद्यार्थ्यांना उपलब्ध करण्यास सांगितलं जातं. कारण प्रयोगासाठी लागणारे साहित्य विद्यार्थी आपल्या परिसरात शोधतात; विचार करतात . त्यांच्या कल्पनाशक्तीला त्यातून वाव मिळतो विद्यार्थी साहित्याला पर्याय शोधू शकतात. जे साहित्य त्यांना उपलब्ध होणार नाही ते शाळेतून दिले जाते. संपूर्ण साहित्य जमा करून झाल्यावर वर्गामध्ये प्रथम त्या प्रयोगाचे सादरीकरण घेतले जाते. काही दुरुस्ती असल्यास त्यांना मार्गदर्शन केले जाते. आणि नंतर परिपाठात प्रयोग घेतला जातो.
प्रयोग सादरीकरणाचे टप्पे :
प्रयोगाचे नाव
आवश्यक साहित्य
साहित्य निर्मिती
प्रयोग प्रात्यक्षिक
स्पष्टीकरण
वैज्ञानिक तत्व
वरील प्रमाणे प्रयोगाचे सादरीकरण विद्यार्थ्यांमार्फत घेतलं जातं.
This Frame -My Friend हा उपक्रम दैनंदिन प्रकारातला आहे यामध्ये एक फ्रेम शाळेच्या मैदानातील झाडाला टांगली जाते त्या फ्रेममध्ये नाविन्यपूर्ण वैज्ञानिक माहितीचे पोस्टर टाकलं जातं. विद्यार्थी मोकळ्या वेळात म्हणजे (लहान सुट्टी आणि मोठी सुट्टी) तसेच इतर वेळी पोस्टर मधील माहिती वाचतात. या फ्रेम च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दररोज नवनवीन माहिती मिळते. या उपक्रमासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला एक पोस्टर बनवायला सांगितले जाते. A4 Size चे पोस्टर विद्यार्थ्यांनी बनवलेले असतात. त्यामध्ये प्रामुख्याने विज्ञान, भूगोल विषयाच्या अभ्यासक्रमातील माहिती, जगभरातील नवीन आणि उपयुक्त माहिती, वैज्ञानिक आकृत्या, आलेख या सर्वांवर विद्यार्थी पोस्टर बनवतात. पोस्टर आकर्षक बनवावे जेणेकरून वाचताना उत्साह आणि आनंद वाटेल. यामध्ये वयोगटानुसार आपण हा उपक्रम राबवू शकतो. आमच्या शाळेत सहावी ते आठवीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी पोस्टर बनवलेले आहे. दररोज सकाळी हे एक पोस्टर फ्रेम मध्ये लावले जाते. आणि शाळा सुटल्यावर ते पोस्ट आणि फ्रेम पुन्हा वर्गामध्ये ठेवले जातात. या उपक्रमांमधून वैज्ञानिक माहिती विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होते विज्ञान तसेच वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळते. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना शालेय तसेच इतर स्पर्धा परीक्षांमध्ये होतो. स्वतः पोस्टर बनवल्याने माहितीचे संकलन तसेच ज्ञानाचे दृढीकरण होते. ज्ञानवृद्धी तसेच विज्ञान विषयाची आवड या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये होत असते...
विज्ञान कुतुहल, गोष्ट विज्ञानाची हे उपक्रम दररोज परिपाठामध्ये घेतले जातात. विज्ञान विषयक दैनंदिन जीवनातील विविध घटना, नैसर्गिक घडामोडी, भौगोलिक वैशिष्ट्ये, विविध घटनांचे शास्त्रीय कारणे इत्यादी बाबत माहिती सांगितली जाते. उदाहरणार्थ - आकाशाचा रंग निळा का असतो ? विमान आकाशात कसे उडते? अशा प्रकारच्या प्रश्नांचे स्पष्टिकरण केले जाते. ही गोष्ट सांगण्यासाठी दररोज एका विद्यार्थाच्या निवड केली जाते. या उपक्रमामुळे मुलांच्या अनेक संकल्पना स्पष्ट झाल्या आहेत.सुरुवातीला शिक्षक विज्ञानाची गोष्ट सांगतील त्यानंतर विद्यार्थी यामध्ये सहभागी घेतले जाते.
शालेय स्तरावर मुलाना विविध प्रयोग करण्यासाठी मिळालेली संधी व विज्ञान दिनाच्या दिवशी आपण विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रदर्शन भरवू शकतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित स्टॉल्स, अंधश्रद्धा विषयक स्टॉल्स इत्यादी घटकांवर प्रदर्शन भरवता येईल. मुलांमधीला सुप्त शात्रज्ञ जागा होवून मुलांची विज्ञानातील प्रगती दिसून आली. कृतीयुक्त अध्ययन तसेच कुतुहल या सर्व बाबी या उपक्रमातून यशस्वी होतील.