Click Here to Download Android App for Regular Updates
ICT संसाधने रसायनशास्त्र (Chemistry) : रसायनशास्त्र या विषयासाठी खालील मोबाईल application वापरता येतात.
Periodic Table. मूलद्रव्यांची माहिती सांगणारे application आहे. 1
Beaker या application मदये रासायनिक अभिक्रिया करता येतात.
Molecular constructor
PMevidya AR
तसेच रसायनशास्त्र विषयासाठी खालील वेबसाइट्स उपयुक्त ठरतात.
Freeplane - Mindmapping साठी Easeely- Graphical representation साठी
Scratch-animation बनविण्यासाठी Canva - Templet तयार करण्यासाठी
Avogadro विविध प्रकारचे molecular structure बनविण्यासाठी तसेच बनवून दाखविण्यासाठी या सॉफ्टवेअर चा उपयोग होतो. Avogadro एक प्रगत रेणू संपादक आणि व्हिज्युअलायझर आहे जो संगणकीय रसायनशास्त्र, आण्विक मॉडेलिंग, जैव सूचना विज्ञान, साहित्य विज्ञान आणि संबंधित क्षेत्रांमध्ये क्रॉस-प्लॅटफॉर्म वापरासाठी डिझाइन केलेले आहे.
JMol या सॉफ्टवेअर च्या साहाय्याने रेणूंची रचना तयार करता येते. यामध्ये 3D स्वरुपात मॉडेल्स बनवता येतात. हे सॉफ्टवेअर संगणकावर वापरता येते.
KALZIUM हे दोन्ही स्वरूपात (application and software) उपलब्ध आहे. याच्या साहाय्याने आवर्त सारणी मधील प्रत्येक मूलद्रव्यांची सखोल माहिती मिळते.
ChemTube3D यामध्ये प्रगत शालेय रसायनशास्त्र आणि विद्यापीठ रसायनशास्त्र अभ्यासक्रमांमधील काही सर्वात महत्वाच्या विषयांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सहाय्यक माहितीसह परस्परसंवादी 3D रसायनशास्त्र अनिमेशन आणि संरचना आहेत.
CHEMIX रसायनशास्त्र मधील वेगवेगळ्या घटकांतील विविध आकृत्या आपण या सॉफ्टवेअर च्या मदतीने काढता येतात. तसेच रसायनशास्त्र मधील वेगवेगळे apparatus आपण याच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना दाखवू शकतो व त्याचा वापर सुदधा करू शकतो
ChemCollective यामध्ये आभासी प्रयोगशाळा, परिस्थिती-आधारित शिक्षण क्रियाकलाप, ट्यूटोरियल आणि संकल्पना चाचण्यांचा संग्रह आहे. शिक्षक आमची सामग्री प्री-लॅबसाठी, पाठ्यपुस्तकांच्या गृहपाठाच्या पर्यायांसाठी आणि व्यक्ती किंवा संघांसाठी वर्गातील क्रियाकलापांसाठी वापरू शकतात. विद्यार्थी आमच्या व्हर्च्यूअल लॅब, सिम्युलेशन आणि ट्यूटोरियल वापरून रसायनशास्त्राच्या संकल्पनांचे पुनरावलोकन करू शकतात आणि शिकू शकतात
ChemCollective यामध्ये आभासी प्रयोगशाळा, परिस्थिती-आधारित शिक्षण क्रियाकलाप, ट्यूटोरियल आणि संकल्पना चाचण्यांचा संग्रह आहे. शिक्षक आमची सामग्री प्री-लॅबसाठी, पाठ्यपुस्तकांच्या गृहपाठाच्या पर्यायांसाठी आणि व्यक्ती किंवा संघांसाठी वर्गातील क्रियाकलापांसाठी वापरू शकतात. विद्यार्थी आमच्या व्हर्च्यूअल लॅब, सिम्युलेशन आणि ट्यूटोरियल वापरून रसायनशास्त्राच्या संकल्पनांचे पुनरावलोकन करू शकतात आणि शिकू शकतात
ICT संसाधने ICT संसाधने : जीवशास्त्र (Biology) : जीवशास्त्रासाठी जीवशास्त्रासाठी खालील वेबसाइट्स उपयुक्त ठरतात.
National geographic Kid या वेबसाईटवर अनेक व्हिडिओज, Games, Puzzles उपलब्ध आहेत, ज्याचा वापर आपण जीवशास्त्रातील विविध संकल्पना समजावून देताना करू शकतो. वेगवेगळ्या गेम्स आणि पझल्स यांच्या माध्यमातून विद्यार्थी संकल्पनांचे दृढीकरण करू शकतात.
H5P या वेबसाईटवर आपल्याला स्वतःचे अकाउंट तयार करायचे असते अकाउंट तयार झाल्यानंतर आपण आपल्या विषयाचा कंटेंट अतिशय रंजक पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने बनवू शकतो यामध्ये विविध प्रकारचे पझल्स, गेम्स, व्हिडिओज आपण तयार करू शकलो. उदाहरणार्थ - Drag and drop Game.
Zygote body 2
मानवी शरीर आणि त्यासंबंधीत विविध संकल्पना प्रत्यक्ष अनुभव स्वरूपात समजावून सांगण्यासाठी या वेबसाईट चा उपयोग होतो. यातील कंटेट interactive स्वरूपाचा आहे.
Edmentum AR Biology (Disection)
हे एक मोबाईल अॅप्लिकेशन आहे यावर आपण फ्रॉग Disection करू शकतो फ्रॉक डिसेक्शनच्या सर्व स्टेप्स आपल्याला Augmented Reality च्या साह्याने करता येतात.
ICT संसाधने भौतिक शास्त्र (Physics) : भौतिक शास्त्र विषयासाठी आपण खालील साधने अधिक परिणामकारक पद्धतीने वापरू शकतो.
Word Art- वर्ड आर्ट या सॉफ्टवेअर मध्ये आपण स्वतः चे टेम्प्लेट तयार करू शकतो विषयातील विविध संकल्पना वर आधारित नोट्स चित्राचा वापर करून आपण तयार करून विदयार्थ्यांना देऊ शकतो.
Geogebra:
Physics Simmulation यातील Simmulation अत्यंत सोप्या पद्धतीने देण्यात आलेले असून विद्यार्थी स्वतः वेगवेगळ्या parameters वा वापर करून संकल्पना समजून घेऊ शकतात.
PhET
वरील वेबसाईटवर विदयार्थी तसेच शिक्षकः स्वतःचे सिमुलेशन्स तयार करू शकतात व विविध संकल्पना सिमुलेशन च्या साह्याने समजावून घेऊ शकतात. या वेबसाईटचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यावर विद्यार्थी एखादी संकल्पना समजून घेते असताना त्या संकल्पनेतील प्रक्रिया आकडेवारी साहित्य इत्यादी गोष्टी बदलून पडताळून पाह शकतात
https://surendranath.org/ ही वेबसाईट पूर्णपणे मोफत असून या वेबसाईटवर भौतिक शास्त्रातील विविध संकल्पनांवर आधारित interactive कंटेंट उपलब्ध आहे या वेबसाईटवर आपण सहजरित्या प्रयोग करून पाहू शकतो.
My Physics lab. Com 3
या वेबसाईटवर आपण वेगवेगळ्या प्रकारचे Simmulation पाहू शकतो तसेच त्यासोबत वेगवेगळ्या कृती करू शकतो येथील Simmulation हे आंतरक्रिया करण्यास योग्य असन प्रयोग करत असताना वेगवेगळे ऑयाम आपण जोडू शकतो वेगवेगळ्या आयाम जोडल्यामुळे विद्यार्थ्यांना एक प्रयोग वेगवेगळ्या प्रकारे समजावून सांगता येऊ शकतो.
Stellaruim
याच्या साह्याने आपण थ्रीडी फॉरमॅटमध्ये अवकाशातील विविध घटक अभ्यासू शकतो थोडक्यात या वेबसाईटचा वापर दुर्बीण प्रमाणे आपण करू शकतो.
ICT संसाधने (इतर) :
एकूण सर्व विषयांना उपयुक्त ठरणारे काही वेब पेज..
1) OLabs
OLabs या कल्पनेवर आधारित आहे की प्रयोगशाळेतील प्रयोग इंटरनेटचा वापर करून अधिक कार्यक्षमतेने आणि कमी खर्चात शिकवले जाऊ शकतात. काही भौतिक प्रयोगशाळांमध्ये एकावेळी सर्व विद्यार्थी प्रयोग करून पाह शकत नाहीत. विद्याथ्यर्थ्यांना दुर्मिळ तसेच महाग उपकरणे असल्यामुळे उपकरणे उपलब्ध केले जात नाहीत. उपकरणे उपलब्ध नसलेल्या विदयाथ्यौनाही या प्रयोगशाळा उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात. हे त्यांना चांगल्या सुसज्ज शाळांमधील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करण्यास मदत करते आणि डिजिटल विभाजन आणि भौगोलिक अंतर दूर करते. केवळ थोड्या काळासाठी भौतिक प्रयोगशाळेत प्रवेश करताना जाणवणान्या अडचणींवर मात करून प्रयोग कधीही आणि कुठेही करता येतात. सर्व विषैयांचे प्रयोग आपण या सॉफ्टवेअर च्या साहाय्याने करता येतात. https://www.olabs.edu.in/
2) Go Lab
प्राथमिक तसेच माध्यमिक गटातील विज्ञान विषयात असणाऱ्या विविध संकल्पना अंतरक्रियेच्या माध्यमातून या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने शिकवता येतात विद्यार्थी स्वतः विविध प्रयोग या ठिकाणी करु शकतात.
3) Toys from Trash
अरविंद गुप्ता यांच्या टॉईज फ्रॉम ड्रेस या वेबसाईटवर विज्ञानातील विविध संकल्पना अगदी सोप्या साध्या सहज करता येतौल अशा प्रयोगांमधून कशा समजावून देता येतात या संदर्भात हजारो व्हिडिओज येथे उपलब्ध आहेत.
https://www.arvindguptatoys.com/toys.html
4) DIKSHA
दीक्षा हा प्लॅटफॉर्म सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात डिजिटल कंटेंट उपलब्ध करून देतो विज्ञान विषयक व्हिडिओज तसेच विविध प्रश्नावली वर्कशीट्स आपल्याला या प्लॅटफॉर्मवर सहज मिळू शकतात शिक्षकांसाठी सुदधा व्हिडिओज दीक्षा प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.
5) PhET
सुमारे 1.4 अब्ज Simmulations या प्लॅटफॉर्म वर उपलब्ध आहेत. भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र गणित अशा विविध विषयांवर आधारित इंटर ऍक्टिव्ह सिमुलेशन्स येथे उपलब्ध आहेत.